नाशिक प्रतिनिधी शैक्षणिक क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टतता केंद्र 'चक्र'चे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नेहमी प्रयोगशील विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असते यामुळे नाशिकच्या प्रगतीत भर पडत आहे.या विद्यापीठाची ख्याती आता देशभर पसरली आहे.
येणाऱ्या काळात या विद्यापीठाच्या माध्यमातून देशभरात वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती दिसणार आहे. या चक्रच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास साधला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादा भुसे,मंत्री . गिरीश महाजन, मंत्री नरहरी झिरवळ, डॉ. माधुरी कानिटकर, खा. शोभा बच्छाव, आ. सीमा हिरे,आ. राहुल आहेर, आ. दिलीप बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
