आश्वी संजय गायकवाड
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील विविध कार्य़कारी सेवा सोसायटीच्या एका रिक्त असलेल्या जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीतुन झालेल्या निवडणुकीत मा.आमदार बाळासाहेब थोरात गटाच्या उमेदवाराचा विजय झाला.
या सोसायटीत एकुण १३ सदस्य असुन सात सदस्य मंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्या गटाचे असुन सत्ताही विखे गटाची आहे तर सहा सदस्य मा.आमदार बाळासाहेब थोरात गटाचे असुन नामदार विखे गटाचे कैलास मुळे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे ही एक जागा रिक्त झाली होती.
गुरूवार दि २६ जुन रोजी एक सदस्य निवडीसाठी संगमनेर येथील उपनिबंधक कार्यालयात निवडणुक अधिकारी राजेद्र वाकचौरे यांच्या उपस्थितीत निवडणुक प्रक्रिया करण्यात आली. या रिक्त जागेसाठी थोरात गटाकडुन वेणुनाथ गायकवाड तर विखे गटाकडून
कै.कैलास मुळे यांचे बंधु राजेंद्र मुळे यांना उमेदवारी देण्यात आली दोन्ही गटाकडुन माघार न झाल्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली यात दोघांनाही समसमान म्हणजे प्रत्येकी सहा मते पडले शेवटी चिठ्ठी काढण्याचा निर्णय होऊन यात थोरात गटाचे वेणुनाथ गायकवाड यांना नशीबाने साथ दिल्याने चिठ्ठीव्दारे ते विजयी झाले.