वरवंडी संपत भोसले- संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे येथे वह्या व पेन शालेय साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.
संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी असे आवाहन केले होते की मला भेटायला आलेल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी शाल अथवा कुठलीही भेटवस्तू न आणता वह्या व शालेय साहित्य आणावेत साहित्य आपण तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत या आव्हानाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर अमोल खताळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन वह्या व शालेय साहित्य दिले ते साहित्य आज अखेर वरवंडी शाळेमध्ये वाटप करण्यात आले.
प्रसंगी गावाला माध्यमिक विद्यालयाच्या संचालक सौ.लिलावती सरोदे भाजपा युवा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले अल्पसंख्यांक घटक अध्यक्ष अहिल्यानगर भाजपा रऊफ शेख खांबे गावचे सरपंच रवींद्र दातीर वरवंडी येथील ग्रामस्थ प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष एकनाथ वर्पे ,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष राजा बापु वर्पे , कैलास बबन वर्पे, विठ्ठल भोसले, बापूसाहेब वर्पे, बाळासाहेब बकुळे , तुळशीराम पाटोळे ,संतोष वर्पे ,सागर शिंदे, दत्तात्रय वर्पे ,भगवान भोसले सिद्धार्थ भोसले, आदी उपस्थित होते.