शाहू महाराजांनी शेती विषयक धोरण राबवुन उपेक्षित तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले -महेंद्र पगारे
येवला प्नतिनिधी शाहू महाराज यांनी त्याकाळात शेतीविषयक धोरण राबवून पाठ पाणी बंधारे तलाव बांधले दलित मागासवर्गीय समाज्यातील होतकरू मुलांना आरक्षण देऊन संधी उपलब्ध करून देणारे आरक्षण जनक म्हणून त्यांना ओळखले जाते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना मदत करून त्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठिशी खंबीर पणे उभे राहीले असा लोक कल्याणकारी राजा पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केले.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयात शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळेस महाराजांच्या प्रतिमेला पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव यांनी पुष्पहार अर्पण केला तर बाळासाहेब आहिरे यांनी प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय घोडेराव होते तर आभार नवनाथ पगारे यांनी मानले.
प्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे( येवला तालुका अध्यक्ष विजय घोडेराव तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब आहीरे (तालुका उपाध्यक्ष वानोद त्रिभुवन सल्लागार सुरेश खळे युवक तालुकाध्यक्ष मयुर सोनवणे चिटणीस नवनाथ पगारे सल्लागार अँड.अनिल झाल्टे पिटर काळे गणेश झाल्टे गणेश खळे युवराज पगारे कृष्णा गोरे महीला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौआशा आहेर याच्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.