नाशिक दिनकर गायकवाड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका बारा महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.जिल्हा परिषद गट व गणांची नव्याने पुनर्रचना करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यात आता ७४ जिल्हा परिषद गट, तर १४८ पंचायत समिती गण राहणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३८ सदस्य संख्या आवश्यक राहणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी प्राथमिक तयारी सुरु केली आहे. या अंतर्गत आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे प्रारूप गट व गणरचनेचा आराखडा मागविला आहे. सद्य:स्थितीत तालुका पातळीवर हे काम प्राथमिक टप्प्यावर सुरू झाले आहे. यामुळे आता इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, याबाबतच्या आदेशाकडे आता लक्ष लागले असून, एक-दोन दिवसांत आदेश येईल, असे सांगण्यात आले.
नवीन आराखड्यानुसार जिल्हा परिषदेचे एकूण गट ७४ होणार आहेत. निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत व ओझारला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यामुळे दोन गट कमी होणार आहेत. चांदवड, मालेगाव आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट वाढणार आहेत, तर गण १४८ होणार असून, गट व गणांपैकी काहींची पुनर्रचना होऊन आरक्षणही वनव्याने काढण्यात येणार आहे.
२०१७ च्या गट व गण रचनेप्रमाणे २०२५ मध्ये होणारी निवडणूक होणार आहे. चांदवड, सुरगाणा व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट व दोन दोन गण नावाने निर्माण होणार आहेत. गट व गणाची रचना ही २०२२ मध्ये ज्याप्रमाणे होती, त्याप्रमाणेच राहणार आहे. गट व गणाची पुनर्रचना करण्यास सांगितले असून, यामध्ये थोडाफार एखाद दुसऱ्या गावाचा बदल होऊ शकतो. ही गट रचना झाल्यानंतर त्यावर हरकती मागवल्या जातील. त्यानंतर आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
२०२२ मध्ये जसे आरक्षण निघाले होते तसेच किंबहुना त्यात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या ३ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. सर्वोच न्यायालयाच्या निर्देशानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी गुरू केली असून सर्वच पक्षांनी गणिते जुळविण्यास सुरुवात केली आहे.
२०१७ मधील तालुका निहाय गट बागलाण, कळवण ४, दिंडोरी-६, नाशिक ४, इगतपुरी ५, मालेगाव ७, देवला ३. सुरगाणा ३. पेठ-२, चांदवड ४, येवला-५, सिर ६, निफाड - १०, त्र्यंबकेश्वर ३, नांदगाव ४
