बुलढाणा सिटीलाईन न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काल सकाळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथील संगम चौकात आयोजित हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी आंदोलनात सहभागी होऊन निषेध व्यक्त केला.
मराठी ही केवळ भाषा नसून आपला अभिमान आणि आपली संस्कृती आहे. त्यामुळे मराठीला डिवचण्याचा प्रयत्न आम्ही शिवसैनिक खपवून घेणार नाही.हिंदी सक्ती बाबतचा निर्णय आम्हाला मान्य नाही. बळजबरीने लादण्याचा कुणी प्रयत्न करु नये.
आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. जशास तसे उत्तर देऊ. महाराष्ट्रात चालेल तर फक्त मराठी.इतर भाषांचा आम्ही सन्मान करतो.मात्र आमच्या संस्कृतीवर हल्ला सहन केला जाणार नाही. यावेळी "हिंदी सक्तीच्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाची होळी करून निर्दशने व निषेध करण्यात आला.
प्रसंगी आदेशाची होळी करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जालिंदर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख, शिवसेना प्रवक्ता सौ.जयश्री शेळके,सौ विजया खडसन,नंदू कऱ्हाडे युवा सेना जिल्हा प्रमुख,डी एस लहाने, लखन गाडेकर, विजय इंगळे,मा. प.स.
सभापती सुधाकर आघाव. विजय इतवारे, प्रकाश डोंगरे,अशोक मामा गव्हाणे, आशिष बाबा खरात, बबन खरे, श्याम खडके,श्याम सावळे,शेख रफिक, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, संजय दर्डा, हरिभाऊ शिनकर, एकनाथ कोरडे, संजय गवळी, संजय शिंदे, गजानन उबरहंडे, राहुल जाधव,रामू राजपूत, गणेशसिंग जाधव, वसीम सय्यद, पृथ्वीराज राजपूत, तानाजी पैठणे,दत्ता जाधच तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.