श्रीरामपूर दिपक कदम येथील सह्याद्री ट्रेकर्स परिवार तर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप होत असते यावेळी शहरातील खटोड कन्या विद्यालयात नुकतेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहातून गरजू विद्यार्थी बाजूला पडू नये हा एकमेव सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री ट्रेकर्स परिवाराचे सचिन चंदन, सचिन भांड, श्रीकांत दहिवाळ प्रवीण शिंदे किरण काळे आदी
टीम सातत्याने हा सामाजिक उपक्रम राबवत आहे.त्यांनी दिलेल्या या शैक्षणिक साहित्याबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष दत्तात्रय साबळे यांनी सह्याद्री ट्रेकर्स परिवाराचे कौतुक केले याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सौ नंदा कानिटकर सेवक प्रतिनिधी प्रा.आदिनाथ जोशी अवधूत कुलकर्णी असलम शेख मधुकर पवार पंकज देशमुख ,श्रीमती निर्मला लांडगे,सौ.सुधा कुऱ्हे आदि शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.