वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील प्रिंप्री लौंकी अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा मार्च २०२५ निकाल ९७.१४ टक्के लागल्याने पंचक्रोशीतून समाधान व्यक्त होत आहे येथील प्रवरा विद्यालय शिक्षणासाठी नामांकित असल्याचे पालकांचे मत दिसून येत आहे.प्रवरा विद्यालयात झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम क्रमांक कु.पायल अजय कदम हिने मिळविला असून तिला ९३.२० शेकडा गुण मिळाले आहे तर द्वितीय क्रमांक कु.साक्षी राहुल कदम हिने मिळविला तिला ८८ २० टक्के गुण असुन तृतीय क्रमांक- कु.समिक्षा संतोष घुगे हिने प्राप्त केला तिला ८६.८६ शेकडा गुण मिळाले आहे
चतुर्थ क्रमांक कु.पल्लवी चंद्रकांत रोडे हिला मिळाला असून ८६.२० टक्के गुण आहे पाचवा क्रमांक- सुदर्शन सुरेश मुंढे यांचा आला असून त्याला देखील समाधानकारक म्हणजे ८४.६० टक्के गुण आहेत.विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल
उत्कृष्ट लागल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक तायगा मल्लू शिंदे व सर्व शिक्षकांचे स्थानिक स्कूल कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य
यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले तर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील इतर गावांने देखील या विद्यालयाच्या चांगल्या निकालाचे कौतुक आणि समाधान व्यक्त केले आहे. प्रवरा विद्यालयाच्या चांगल्या निकालामुळे येथे नूतन प्रवेशासाठी गर्दी होताना दिसत आहे.