वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकई अजमपुर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विद्यार्थी,विद्यार्थिनींना सरपंच सौ.संगीता भारत गिते यांच्या हस्ते शालेय साहित्याचे करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य आणि समाधान दिसुन येत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंढे होते. विचारमंचावर जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारत गिते, विविध कार्यकारी सोसायटी सोसायटीचे अध्यक्ष सिताराम दातीर,रामदास दातीर, ज्ञानदेव गिते,मुख्याध्यापक तायगा शिंदे होते.
प्रसंगी बोलतांना भारत गिते म्हणाले, विखे परिवार हा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांचेपासून सहकार, राजकारण, समाजकारण सक्रीय असताना सर्वसामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा अविरत लढा सुरू आहे.आजही महाराष्ट्रात विखे पॅटर्न एक विकासाचा पॅटर्न,ज्ञानाची गंगोत्री म्हणून राज्याला परिचित आहे.
पिंप्री लौकई गावचा सर्वांगीण विकास पालकमंत्री मंत्री नामदार विखे पा.यांच्या मुळे झाला आहे.आज खेडोपाडी शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. त्यांचाच वारसा आज भक्कमपणे नामदार विखे पाटील पुढे चालवित आहेत. जनहित प्रर्वतक बनलेला विखे परिवार, आजही तितक्याच आत्मियतेने समाजासाठी झटत आहे आणि शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांना त्यांनी माणूस म्हणून मुख्य प्रवाहात आणले आहे.
यावेळी ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थी,विद्यार्थिनींना वह्या, पुस्तके व शालेय साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उंबरकर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक तायगा शिंदे यांनी मानले.