ठाणे विशाल सावंत- ठाण्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या,विकासकामे व मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी ठाण्यात कार्यरत विविध संघटनांचे प्रतिनिधी मंडळ घेऊन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या प्रसंगी संबंधित विषयांवर निवेदने सादर करण्यात आली व समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे
या भेटीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे,नगरसेवक रमेश आंब्रे, नवतेश्वर सिंग आणि विलास पाटील यांचीही उपस्थिती लाभली.
ठाणेकरांच्या हितासाठी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद निर्माण करून नागरी प्रश्न सोडवण्यासाठी हा एक सकारात्मक टप्पा ठरणार असल्याचे बोलले जातेय.
