येवला प्नतिनिधी येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पगारे हे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे येवला तालुकाध्यक्ष म्हणून अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहे महेंद्र पगारे हे पॅथर नेते मनोजभाई संसारे यांचे कट्टर समर्थक असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
महेंद्र पगारे यांनी शासन दरबारी अनेक मोर्चे आंदोलने उपोषणे केलेले असुन त्याच्या आंदोलनाला न्याय देखील मिळालेला आहे ते अनुकटे सावखेडे गावच्या सोसायटीचे अध्यक्ष देखील आहे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून यदांच्या समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचा सामाजिक व राजकीय कामाचा चांगला अनुभव असून त्यांच्या कामाचीच पावती आहे.म्हणून येवला तालुक्यात प्रथमच जिल्हाध्यक्ष पदाचा मान महेंद्र पगारे यांच्या माध्यमातून मिळाला आहे नुकतीच त्यांची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे पक्षाध्यक्ष सागर संसारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली झाली
सागर संसारे यांनी नाशिक जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली व नवीन जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांचा नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला महेंद्र पगारे यांच नाव समोर येताच उपस्थितीत असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठींबा देत जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेस महेंद्र पगारे यांना पक्षाचे नियुक्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन पक्षाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
महेंद्र पगारे यांना जिल्हाध्यक्ष पद मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी व मित्र परिवाराने आनंद व्यक्त करत शुभेच्छाचा वर्षाव केला
यावेळेस स्वारीपचे पक्षाध्यक्ष सागर संसारे अरुण धिवर (पक्ष कार्याध्यक्ष)भगवान गरूड (ना.जि.संपर्क प्रमुख)ओंकार जयस्वाल किशोर जाधव सिध्दार्थ भालेराव मिलिंद हाटे गणेश जावळे दिपक शेजवळ प्रशांत पगारे बाळासाहेब आहिरे संदिप खडताळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनिता गडाधरा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
