नाशिक दिनकर गायकवाड महिलेच्या हातातील पर्स व त्यातील सोन्या चांदीचे दागिने, महत्वाची कागदपत्रे असा सुमारे सम्वा दोन लाखांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी एका महिलेसह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्योती संचितकुमार पंडा (रा. राधाकृष्ण कॉलनी, बहमाला, ओडिशा) ही महिला दि. १५ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मीनाताई ठाकरे स्टेडीयमच्या जवळून जात होती. त्यावेळी आरोपी हीना खान (रा. पोलीस कॉलनी, छत्तीसगड), मुस्कान शेख,
साहित खान, निशांत व इतर चार ते पाच आरोपी यांनी संगनमत करून पंडा यांच्या हातातील पर्स बळजबरीने हितकावून बोरून नेली. यामध्ये रोख रक्कम, दागिने, महत्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख १६ हजारांचा ऐवज बोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात हीना खान शिष्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेमागे करीत आहेत.
