गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याला सलाम करत मडगावात गोवा क्रांती दिन साजरा

Cityline Media
0
भीमशक्ती गोवा प्रदेश व शॅडो कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मडगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क भीमशक्ती गोवा प्रदेश व शॅडो कौन्सिल मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रेस चर्च हॉल, मडगाव, गोवा येथे गोवा क्रांती दिन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे खा.चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते. 

गोवा क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यसभा खासदार व सी डब्लु सी सदस्य  चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले की, “महाराष्ट्राप्रमाणेच गोवा राज्यातही भीमशक्ती धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित राहून बहुजन समाजाच्या न्याय व हक्कांसाठी निर्णायक लढा देईल!”
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. भूषण गायकवाड (प्रभारी, भीमशक्ती गोवा), ज्ञानेश्वर वारखंडकर (अध्यक्ष, भीमशक्ती गोवा), सावियो कुटिनो (माजी नगराध्यक्ष, मडगाव गोवा), श्रीमती ॲड. प्रतिमा कुटिनो, काँग्रेस नेत्या प्रतिभा बोरकर,रोहिदास देसाई (अध्यक्ष फ्रिडम फायटर असोसिएशन) राया शिरोडकर (फ्रिडम फायटर), झाक्रिस गोंएस (माजी सरपंच),. हर्क्युलेनो निस्साव (माजी सरपंच), स्नेहल ओंन्साकार, ॲड. प्रसेनजित ढगे (लिगल ॲडव्हायजर भीमशक्ती),. रामा कानकोणकर, सर ॲन्थोनी डिसल्वा ॲनिइल ॲलवारेस. लोयोला. शशी कांबळे,. नामदेव धारगळकर. सुदेश हसोटीकर, अर्चना नाडकर्णी यांच्यासह विचार मंचावर मान्यवर मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमात सावियो कुटीनो यांची भीमशक्ती दक्षिण गोवा अध्यक्ष पदी व श्रीमती प्रतिभा बोरकर यांची भीमशक्ती गोवा महिला प्रदेश कार्याध्यक्ष पदावर महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर करण्यात आली. 

तसेच या कार्यक्रमात अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या विमान दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांना मौन पाळून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याला सलाम करत “गोवा क्रांती दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमात संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय व जनजागृती यावर भर देण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक ऐक्य, संविधानिक जाणीव व नवचेतनेचा जागर ठरला!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!