संगमनेर प्रतिनिधी शहरातील ताजणे डायग्नोस्टिक्स सेंटरचे उद्घाटन मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
ताजणे बंधूंनी एकाच छताखाली अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा — थ्री टेस्ला (३टी) एम आर आय, सिटी स्कॅन, थ्री डी -फोर डी सोनोग्राफी,मॅमोग्राफी आणि एक्स-रे उपलब्ध करून दिल्या आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला उद्योजक राजेश मालपाणी, डॉ.जयश्री थोरात, डॉ. आदित्य दफ्तरी, डॉ. मालिनी लवंदे, डॉ. अमित, संकेत, सुरभी आणि प्रियांका ताजणे, तसेच कारखान्याचे संचालक अंकुश ताजणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
