मोर्चातील उद्रेक केवळ निषेध नसून हिंदू अस्मितेचा आवाज बुलंद करणारा होता
कोल्हापूर विशाल सावंत- आज इचलकरंजी येथे "शक्ती ऋतुजा" या नावाने हिंदू जनआक्रोश मोर्चा उत्स्फूर्तपणे पार पडला.या मोर्चामार्फत राज्यसरकारकडे धर्मांतर बंदी कायदा आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
मोर्च्यातील उद्रेक हा केवळ निषेधाचा नव्हता,तर तो हिंदू अस्मितेचा आवाज बुलंद करणारा होता. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला हिंदू धर्माची शक्ती, आपली संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांचे गौरव यांची आठवण करून दिली.
हिंदू परंपरा आणि सणांवर वारंवार करण्यात येणारी विखारी टिका आणि बदनामीचा कट यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. धर्मांतरणाच्या एकाही घटनेला आता मुभा दिली जाणार नाही. हिंदू समाजाचा धमकी, फसवणूक, लालच किंवा भावनिक छळ सहन केला जाणार नाही. अशा घटनांना आता जशास तसे उत्तर दिले जाईल, हे आजच्या मोर्चातून स्पष्ट केले. हा मोर्चा म्हणजे फक्त संताप नव्हता, तर हिंदू समाजाच्या स्वाभिमानाचे जागरण होते.हे इचलकरंजीकरांनी दाखवून दिले.
