आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाची बदनामी करुन नये
श्रीरामपुर दिपक कदम ख्रिस्ती समाजाबद्दल बेताल आणि अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करत येथील ऑल पास्टर फेलोशिप श्रीरामपुर व ख्रिस्ती विकास परिषद यांच्या वतीने तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार श्रीमती व्हि. आर. कल्हापूरे( सांळुके) यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की सांगली येथील राजगे परिवारातील ऋतुजा या विवाहीतेने आत्महत्या केली. परंतु या घटनेला ख्रिस्ती धर्मगुरुच जबाबदार आहे व जो कोणी ख्रिस्ती धर्मगुरुच जीवे मारेल त्यास ११ लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल.अशी जाहीरपणे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी घोषणा केली. त्यांच्या या व्यक्तव्याचा जाहीर निषेध व शासनाने त्याच्यावर योग्य कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी.असे मागणी वजा निवेदन देण्यात आले.
आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाची विनाकारण बदनामी करु नये.ख्रिस्ती समाज दया, शांती दाखविणारा आहे. म्हणून आमदाराने जे व्यक्तव केले आहे.ते निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे असे यावेळी प्रांताधिकारी तसेच पोलिस अधिक्षक यांना निवेदन देताना ऑल पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष रेव्ह राजेश कर्डक यांनी आपले म्हणणे सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीने मनोगतात व्यक्त केले.
यावेळी ख्रिस्ती विकास परिषेदचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम, पा. राजेश कर्डक, पा. विजय खाजेकर, पा. सुभाष खरात,पा. प्रविण गायकवाड, पा. दिपक शेळके, पा. शैलेश अमोलिक , सिस्टर आशा मसिहा, पा. सतिष गायकवाड,पा. आण्णा अमोलिक, पा. चेतन सातदिवे, पा. योगेश ठोकळ, पा. विल्सन बोर्डे, पा. प्रविण सातदिवे, पा. अमर दिवे, पा. लाजारस देठे, पा. भूषण वाव्हाळ, पा.विजू खरे, पा. अभिलेख अमोलिक, पा. संदीप गायकवाड, पा. समीर आल्हाद, पा.भालेराव, पा. नेहम्या, पा. सोळशे, पा. योसेफ वागळे, पा. रमेश भोसले, पा. राजू शिरसाठ, पा. कैलास शिरसाठ, अतिश साळवे, गणेश तुपे, नितीन जाधव, अल्ताफ शेख, विशाल तेलोरे, अविनाश गांगुर्डे, राजेंद्र आवारे आणि इतर ऑल फेलोशिपचे सर्व धर्मगुरु निवेदन देतेसमयी उपस्थित होते.
