नाशिक दिनकर गायकवाड :- देवळा येथील भावडबारी घाटात काल रात्री एक वाजेच्या सुमारास वाहनधारकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्याचा थरकाप उडाला.या घाटात बिबट्या वारंवार आढळून येण्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. काल रात्री नाशिकहून सटाण्याला खासगी रुग्णवाहिका घेऊन जाणारे दिनेश गुंजाळ व चालक गणेश पाकळे यांना भावडबारी घाटात एक वाजेच्या सुमारास एक बिबट्या धक्क्यावर बसलेला दिसला. याप्रसंगी त्यांनी वाहन थांबवून मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. त्या बिबट्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
3/related/default