रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) चे अध्यक्ष श्याम गायकवाड यांनी भाजप सोबत जातील ते आंबेडकरवादी होऊच शकत नाही असे पत्रपरिषदेत नुकतेच स्पष्ट केले.नागपुरातील संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला नवी दिशा देइल,असा आशावाद व्यक्त करीत आंबेडकरी जनतेमध्ये आता गटातटावरून प्रचंड असंतोष असल्याचे मत व्यक्त केले. समाजवादी, डावे यांच्यातही गटबाजी आहे.मात्र, रिपाईंचे अनेक गटच दिसतात याकडे लक्ष वेधत मुस्लीम,दलित आणि आदिवासींना लक्ष करून या देशात फँसीस्ट विचार बळकट होऊ पाहत असल्याचा आरोप केला.
पीएफआयवर बंदी लादली. कधीकाळी आरएसएस व समता सैनिक दलावरही बंदी असल्याचे सांगत संघावर बंदीची मागणी त्यांच्याच सरकारकडे करणे हास्यास्पद ठरेल असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.