कळमजाई देवी धबधबा ओसंडून वाहतानाचे विहंगम दृश्य
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात निसर्गाच्या कुशीत वसलेला आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला कळमजाई देवी धबधबा सध्या भरभरून वाहत आहे.या विहंगम दृश्यामुळे येथे पर्यटकांनी गर्दी केली आहे सर्वजण या निसर्गाच्या अफलातून अविष्काराकडे मोहित होत आहे.
मुसळधार पावसामुळे धबधब्याला जिवंत रूप प्राप्त झाले असून, संपूर्ण परिसर निसर्गरम्य वातावरणात न्हालेला दिसत आहे.धबधब्याच्या आसपास हिरवाईची चादर पसरली असून,पक्ष्यांचा किलबिलाट,धबधब्याचा आवाज आणि शुद्ध हवा यामुळे येथे आल्यानंतर मन प्रसन्न होते. पावसाळ्यात निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी हा परिसर पर्यटकांना मोहात पाडत आहे.
