शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
श्रीरामपूर दिपक कदम सामाजिक चळवळ टिकली पाहिजे करीता सामाज कार्यास जनहितासाठी जरासा वेळ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सामाजाची प्रगती ही केवळ सरकार किंवा काही नेत्यांच्या कार्यावर अवलंबून नसून,ती सर्वसामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित असते असे प्रतिपादन बालाजी सोनटक्के यांनी केले.
येथील शिव शाहू फुले आंबेडकर प्रबोधन समितीच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला तेव्हा बालाजी सोनटक्के बोलत होते येथील बेलापूर रोड वरील यशोधन कार्यालयात नुकतेच या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना श्री. सोनटक्के म्हणाले की सामाजिक चळवळी हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असते. या चळवळी समाजात अन्याय,विषमता,भ्रष्टाचार, अज्ञान आणि रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठवतात.पण या चळवळींचा प्रभाव टिकवायचा असेल,तर प्रत्येक समाज घटकाने आपली जबाबदारी ओळखून समाजासाठी थोडा वेळ द्यायला हवा.आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण "माझं काय जातंय?" या मानसिकतेत जगत आहेत. ही उदासीनता सामाजिक एकात्मतेला बाधा पोहोचवते. जर प्रत्येक व्यक्ती थोडा वेळ समाजहितासाठी खर्च करेल, तर अनेक समस्या निर्माण होण्याआधीच थांबवता येतील. युवकांनी समाजप्रश्न समजून घेतले पाहिजेत, महिलांनी हक्क आणि समानतेसाठी जागरूक राहिलं पाहिजे, आणि ज्येष्ठांनी आपला अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. सामाजिक चळवळ ही टिकवण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सामूहिक हितासाठी काम करणे आवश्यक आहे. अन्यथा समाज दिशाहीन होईल आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. म्हणूनच, "समाजासाठी वेळ द्यावा,यातुन समाज घडवावा" ही आपली सामूहिक जबाबदारी आहे याकरीता शिव, शाहू,फुले, आंबेडकर प्रबोधन समितीद्वारे वैचारिक परिवर्तन चळवळ उभारली गेली असून राज्यभरातील विविध गांव शहरात याद्वारे सामाजहिताचे कार्य हाती घेण्यात आले आहे,त्याचाच एक भाग म्हणून शिव, शाहू, फुले, आंबेडकर प्रबोधन समितीच्या वतीने सामाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे सन्मान सोहळा होय.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी लोकसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष अशोक (नाना) कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास बालाजी सोनटक्केक (मा.सहा.आयुक्त,तपास अधिकारी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर) व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भास्कर लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती,
शिव,शाहू,फुले आंबेडकर विचार प्रबोधिनी प्रबोधन व गौरव सोहळ्यात सर्वश्री शिवाजी गांगुर्डे,चांगदेव देवराय,समता फाऊंडेशनचे शौकत शेख, कार्लस साठे, सुभेदार कृष्णा सरदार यांचा शाल फेटा, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बालाजी सोनटक्के यांनी सामाजातील उणीवा आणि सामाजाच्या आशा अपेक्षा आणि उपेक्षा यावर प्रकाश झोत टाकत संघटित राहण्याचे फायदे, विखुरले जाण्याचे नुकसान यावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आदिवासी संघटनेचे नेते- शिवाजी गांगुर्डे,कार्लस साठे, सुभेदार कृष्णा सरदार, ॲड.मोहसीन शेख,अमोल शिरसाठ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर अशोक कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक चळवळ याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी अदिवासी समाजाची पहिली महिला वकील ॲड.प्रियंका शिवाजी गांगुर्डे व ॲड.गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्वश्री नितीन शिंदे सरपंच, दादासाहेब कांबळे, सौ. मोहिनी खैरे, सौ.सोनाली देवराय, निलेश भालेराव, दिपक कदम, दिलीप शेंडे,अमोल शिरसाठ, राजेंद्र कोकणे, भाऊसाहेब गव्हाणे, बाळासाहेब सावंत, बंडोपत बोडखे, अर्जुन राऊत, मगर बाळासाहेब गोळेकर, सुदाम मोरे, संजय दळवी, नामदेव कानडे, लक्ष्मण अभंग, नानासाहेब रेवाळे, सतीश बोर्डे, हरिभाऊ बनसोडे, राजेंद्र औताडे, अशिष शिंदे, कल्पेश माने, प्रतीक कांबळे, सम्राट माळवदे, रवि राजुळे, संतोष देवराय, राजू थोरात, संजय केदार, किशोर गाढे, सुभाष पोटे, अशोक खैरे, दिलीप अभंग,समता फाऊंडेशनचे ॲड.मोहसीन शेख, मुश्ताक शेख,नदीम गुलाम, इब्राहीम बागवान ,शेख फरजाना बाजी, सरताज शेख, राजू मोरे, प्रियंका गांगुर्डे, कलीम शेख, हारुण बागवान,छगन क्षिरसागर, किशोर सातपुते, भारत कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनेश देवरे यांनी तर सूत्रसंचालन दिलीप शेंडे यांनी केले.
