महानगरपालिकेची नऊ कोटींची कर वसुली घटली

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड-नाशिक महानगरपालिकेने यंदा कर सवलतीची मर्यादा वाढवून एप्रिल व मे या महिन्यात मिळकत करावर थेट आठ टक्के सूट दिली होती.त्यानंतर जूनमध्येही तीन ऐवजी सहा टक्के अतिरिक्त सूट दिली. मात्र असे असूनही मिळकत धारकांचा कर सवलती बाबत उत्साह दिसून येत नाही.
अतिरिक्त दिलेल्या कर सवलती मुळे यंदा सव्वाशे कोटींपर्यंत वसुली अपेक्षित असताना ती ८८ कोटींवर अडकली आहे. महत्त्वाचे म्हणजे गतवर्षी पेक्षा ८ कोटी ९९ लाखांची घट वसुलीत झाली आहे. थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी नाशिक महानगर-पालिकेच्या कर संकलनने नियमित कर दात्यांना एप्रिल प्रमाणेच मे महिन्यातही आठ टक्के तर जूनमध्ये सहा टक्के कर सवलत दिली. अतिरिक्त तीन टक्के कर सवलत देऊनही कर दात्यांनी असहकार केल्याचे चित्र आहे. मे महिन्यात ६० हजार ९१५ करदात्यांनी २८ कोटी ३५ लाख ५१ हजार ८४१ कर भरला. कर विभागाला २४५ कोटीच

चालू महिन्यात ६ टक्के कर सवलत देण्यात आली आहे. एप्रिल व मे महिन्यात ८ टक्के सवलत देण्यात आली होती. थकबाकी दारांनी कर सवलतीचा फायदा घेऊन महापालिकेला सहकार्य करावे. थकबाकी न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
- अजित निकत, उपायुक्त, करसंकलन विभाग, मनपा, नाशिक.

करसवलतीची संधी देऊनही पालिकेला सुधारित घरपट्टी वसुलीसाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. नाशिक महानगर पालिकेवर पाचशे कोर्टीचा थकबाकीचा डोंगर आहे.

थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी कर संकलन कडून अभय योजना,शास्तीमध्ये ९५ टक्के सूट यासारखी सवलत योजना राबवली.नाशिक महापालिकेला जीएसटी अनुदाना खालोखाल घरपट्टी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. घरपट्टी वसुलीसाठी मनुष्यबळाचा अभाव आणि देयक वाटपातील संथगती मुळे घरपट्टीच्या चालू मागणीसह थकबाकीचा आकडा पाचशे कोटींपर्यंत गेला आहे. घरपट्टीच्या नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला नाशिक महानगर पालिकेने करसवलत योजना राबवली. दरम्यान,

केराची टोपली दाखवणाऱ्यांची यादी कर संकलनने तयारी केली आहे. त्यातील ७४ थकबाकीदारांच्या लिलावाची प्रक्रिया पुढील महिन्यात केली जाणार आहे. त्यांच्याकडे पंचवीस कोर्टीची थकबाकी आहे. तसेच विभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांना जप्ती वॉरंट पाठवले जाणार आहे. १ एप्रिल ते १८ जून दरम्यान सातपूर ३१ लाख. नाशिक पश्चिम ८१ लाख. नाशिक पूर्व ६२ लाख. पंचवटी १४ १० कोटी १६ कोटी १२ कोटी कोटी ४७लाख. नवीन नाशिक २२ कोटी ५२ लाख तर नाशिकरोड- ११ कोटी ७७ लाख रुपये याप्रमाणे कर वसुली करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!