नाशिक दिनकर गायकवाड शहर परिसरात सातत्याने आणि नियमित वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोड्या व चोन्यांच्या घटनांत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत या सततच्या चोऱ्यामुळे नाशिककर अक्षरशः बेजार झाले आहेत.
घरफोडीचा पहिला प्रकार नांदूर गावात घडला.फिर्यादी प्रकाश दिगंबर ताजनपुरे (रा. नांदूर गाव) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला घरातील हॉलमध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटाचे लॉक तोडून, तसेच देवघरातील लाकडी ड्रॉवरमध्ये ठेवलेली २४ हजारांची सहा ग्रॅमची पोत, २० हजारांचे पाच ग्रॅमचे डोरले, २२ हजार रुपयांची पाच ग्रॅम वजनाची चेन व ओम्पान, २० हजारांच्या पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, २० हजारांचे ५० भार चांदीचे दागिने, ६८ हजारांची ७० ग्रॅमची सोन्याची पोत, ६० हजारांचे १५ ग्रॅमचे सोन्याचे वेडे, ६० हजारांचे १५ ग्रॅमचे ओम्पान व चेन व अडीच लाखांची रोकड असा ५ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात परफोडीषा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरफोडीचा दुसरा प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी मधुकर संजय पाटील (रा. सावतानगर, सिडको) हे घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश केला. घरात चार्जिंगला लावलेला एक व उशाला ठेवलेला एक असे १७ हजार रुपयांचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
घरफोडीचा तिसरा प्रकार अंबड एमआयडीसीत घडला. अंबड एमआयडीसीत असलेल्या डोजिंग पंप मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत सिक्युरिटी गार्डमध्ये काम करणारा चेतन कुलकर्णी (रा. नाशिक) याने कंपनीतील ६ हजार ४०० रुपये किमतीचा लोखंडी सामान चोरून नेले. कंपनीतील लोखंडी साहित्य चोरी झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कंपनीमालक महेंद्र वसंत कासार (रा. पाथर्डी रोड, नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
घरफोडीचा चौथा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. फिर्यादी अजय श्रीराम पवार (रा. अनमोल, नयनतारा, पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्या बंद फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॉक अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
यावेळी घरातील कपाटात असलेली एक लाख रुपये किमतीची चार तोळ्यांची सोन्याची पोत, पाचशे रुपयांची चांदीची पायातील पट्टी व पाच हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण १ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आव्हाड करीत आहेत.
घरफोडीचा पाचवा प्रकार कामगारनगर येथे घडला. फिर्यादी सुशीलाबाई छोटेलाल वाडिले (रा. तिरंगा चौक, कामगारनगर, सातपूर) या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. काल (दि. ४) सकाळी साडेदहा ते दुपारी तीन यादरम्यान त्यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक व काहीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटात असलेले ३० हजारांचे आठ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, २१ हजारांचे आठ ग्रॅमचे कानातील झुबके, १८ हजारांचे सहा ग्रॅमचे कानातील वेल, २० हजारांचे तीन ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, १३ हजारांची दोन ग्रॅमची सोन्याची बाळी व ४० हजार रुपये किमतीचे एक किलो चांदीचे कडे, असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध परफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार हिंगे करीत आहेत.
घरफोडीचा सहावा प्रकार अंबड येथे घडला.फिर्यादी किरण दिगंबर कांबळे (रा. घरकुल योजना, अंबड) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घोरट्याने घरातील कपाटात असलेले १३ हजारांची दीड ग्रॅम वजनाची कर्णफुले, १० हजार ५०० रुपयांचे दीड ग्रॅमचे सोन्याचे पान, ८ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे धम्मचक्र, ८ हजारांची एक ग्रॅमची सोन्याची अंगठी, ६ हजारांची एक ग्रॅमची कानातील बाळी,६ हजारांची एक ग्रॅमची सोन्याची नथ,आठ हजारांचे एक ग्रॅमचे कानातील दोन जोड, तीन हजारांची एक ग्रॅमची सोन्याची पोत, पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व ६० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख २७ हजार ४०० रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
घरफोड्यांबरोबरच चोऱ्यांचाही प्रकार उघडकीस आला आहे. चोरीचा व पहिला प्रकार दिंडोरी रोड येथे घडला. फिर्यादी हिरामण किसन लिलके (रा. कोचरगाव, ता.दिंडोरी) हे काल (दि. ४) सकाळी पंचवटीतील मार्केट यार्डमध्ये बैलबाजार येथे आले होते. त्यांनी बकरी बाजाराच्या कोपऱ्याजवळ एमएच १५ डीडब्ल्यू ९३७३ या क्रमांकाची २० हजारांची हिरोहोंडा स्प्लेंडर मोटारसायकल पार्क केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत.
चोरीचा दुसरा प्रकार सोमेश्वर कॉलनी येथे घडला. फिर्यादी प्रशांत रवींद्र पगारे (रा. खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, सातपूर) हे पत्नी व मुलीसह राहत्या घराकडून मेडिकल दुकानात पायी जात होते. त्यावेळी निगळ चौक येथे मोटारसायकलीवरून आलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी पगारे यांच्या हातात असलेला ४० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार डिगे पुढील तपास करीत आहेत.
