सर्व धर्मीयांच्या धर्मगुरूंचे मत
श्रीरामपूर दिपक कदम मराठा समाजाने लग्न संदर्भात आचारसंहिता काढली त्या आचारसंहितेचे समर्थन व कौतुक करून त्याचे अनुकरण समाजातील सर्व घटकांनी केलेच पाहिजे यासाठी मंगळवार दिनांक १० जून रोजी येथील शासकीय विश्रामगृहात रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी शीख धर्मगुरू अनुपसिंग मस्किन मुस्लिम धर्मगुरू मौलाना अकबर अली बौद्ध धर्मगुरू भंते करुणानंद हिंदू धर्म गुरु अरुण जोशी महाराज तसेच भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये मा. उपनगराध्यक्ष
राजेंद्र सोनवणे माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव भैरवनाथ ग्रामपंचायतच्या सरपंच दिपाली फरगडे तेजस गायकवाड बाळासाहेब जपे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सर्वच धर्मगुरू म्हणाले की हुंडा देणे घेणे ही फक्त मराठा समाजामध्ये प्रथा नसून प्रत्येक समाजामध्ये ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे हुंडा दिला जातो घेतला जातो.
काहींची हुंडा घेण्याची पद्धत वेगवेगळी असते कोणी जायचं यायचे भाडे नवरी मुलीच्या वडिलांकडून घेतो किंवा घरामध्ये महागडे फर्निचर ची मागणी केली जाते तसेच खोट्या प्रतिष्ठे साठी लग्नामध्ये नको ते खर्च केला जातो कर्कश आवाजात डीजे लावल्या जातो प्री-वेडिंग केले जाते.
तसेच लग्नाचा मुहूर्त काढल्या जातो परंतु लग्न वेळेवर लागत नाही मग मुहूर्त काढून उपयोग काय असा सवाल देखील सर्व धर्मगुरूंनी समाजाला केला आहे भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे म्हणाले की लग्नामधील प्री-वेडिंग प्रकार बंद झाला पाहिजे त्याने लग्नाला जास्त खर्च केला म्हणजे आपण तेवढाच केला पाहिजे असे नाही तर आपण आपल्या आयपती प्रमाणे खर्च केला पाहिजे असेही ते म्हणाले.
त्यावेळी अध्यक्षीय भाषणात सुभाष त्रिभुवन म्हणाले की ज्या ज्या वेळेस माणसाला माणसाचं मन बदलायचं असतं माणसाला आपलं मन परिवर्तन करायचं असतं ते मन जरी सहजा सहजी बदलता येऊ शकलं नसलं ते मन जरी सहजा सहजी परिवर्तन होऊ शकलं नसलं ही गोष्ट जरी खरी असली परंतु मन बदलायची जी गोळी असते.
परिवर्तनाची जी गोळी असते ती गोळी आपल्याला खावा लागणार आहे ती गोळी जरी खाताना कडू लागली परंतु त्या गोळीला साखरेचा असा लेप देऊन ती गोळी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये गिळावाच लागणार आहे आणि परिवर्तनाची चळवळ तीव्र करावी लागणार आहे असे त्रिभुवन शेवटी म्हणाले.
त्यावेळी प्रवीण फरगडे सुरेश ठुबे रवी चव्हाण दिपक कदम राहुल शहाणे रईस शाहरुख मन्सुरी गोविंद ढाकणे किशोर नागरे दिगंबर शिवदे असलम अत्तार आसिफ मणियार राकेश थोरात गणेश पालकर जावेद अत्तर प्रदीप निकुंभ बॉबी सहानी अक्षय गवळी सुनील दंडवते श्रीकांत वाकडे सुदाम गव्हाणे सुरेश ठाकरे रवींद्र कोरडे ताया शिंदे किरण का तारे जावेद अत्तार जावेद सय्यद फिरोज शेख सागर भांड असदुद्दीन अत्तार विशाल थोरात आदी उपस्थित होते सूत्रसंचालन तेजस गायकवाड यांनी केले आभार गौतम उपाध्ये यांनी मानले
