नाशिक दिनकर गायकवाड-घरा जवळील रस्त्यालगत उभी केलेली रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना श्रमिकनगर येथे घडली.
फिर्यादी जयेश संजय कुमावत (रा. श्रमिकनगर, सातपूर) हे रिक्षाचालक असून, त्यांनी राहत्या घराजवळील रस्त्यालगत एमएच १५ एफयू ३०६९ या क्रमांकाची एक लाख रुपये किमतीची बजाज ऑटो रिक्षा उभी केली होती. ही रिक्षा अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास डुप्लिकेट चावी वापरून चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
