नाशिक दिनकर गायकवाड- सातपूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कार्बन नाका परिसरात रस्त्यावर अडथळे टपऱ्या अनधिकृत फळे भाजी विक्रेत्यांवर कारवाई करताना एक ट्रक साहित्य जप्त केले.या रस्त्यावर फळे भाजी, चहा टपरी, गाहया, फळ विक्रेत्यांमुळे रस्ता अरुंद होत होता. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने फुटपाथवर वरही पायी चालणाऱ्यांना अवघड होत होते त्यामुळे येथील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे.
याबाबत वारंवार तक्रार आल्याने सातपूर अतिक्रमण निर्मूलन विभागाने काल कारवाई करत एक टन साहित्य जप्त केले, फळे भाजीपाला अनाथ आश्रमात देण्यात आला आहे. ही मोहीम तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, सुमित दिये, प्रमोद आव्हाने, मेघनाथ तिडके आदींनी राबवली.
