ग्रामविकास मंत्र्यासह अनेक नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उस्फुर्त सहभाग
पंढरपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पातील 'स्वच्छ भारत' अभियानाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री. जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून 'पंढरपूर महा-स्वच्छता अभियान आषाढी वारी २०२५ आयोजन प्रसंगी पंढरपूर शहरात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या अभियानात सहभाग नोंदवला.
वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी उपस्थिती लक्षात घेता,शहराची स्वच्छता व शुद्धता अबाधित राहावी,भाविकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानात "स्वच्छ पंढरपूर – पवित्र वारी" हा संदेश देत सर्वांनी कचरा उचलणे,कचरा पेट्या बसवणे,प्लास्टिक मुक्त परिसर,तसेच जनजागृती मोहिमा देखील राबवल्या.हा उपक्रम केवळ एकदिवसीय नसून, संपूर्ण वारी दरम्यान सातत्याने स्वच्छतेचा अवलंब करण्याचा निर्धार या अभियानातून दिसून आला.
यावेळी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, 'सोलापूर मध्य'चे . देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी सोलापूर. कुमार आशीर्वाद, पंचायत समिती मंगळवेढाचे गटविकास अधिकारी. योगेश कदम, तसेच विविध शासकीय अधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी कार्यकर्ते, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
