अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्ह्यातील स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्री उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विश्वस्त व संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार अहिल्यानगर जिल्हयात ज्यांचे उत्कृष्ट पत्रकार म्हणून नांव घेतले जाते तसेच संघटनेसाठी नेहमीच काही ना काही करायला हवे अशी जिद्द मनात बाळगून काम करणारे श्रीरामपूर येथील मुक्त पत्रकार दिपक कदम यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे दीपक कदम यांनी आपल्या लेखणीतून आणि प्रश्नांना वाचू फोडली अनेक दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दीपक कदम यांची लेखणी सदैव तत्पर असते ते मुक्त पत्रकार असल्याने माहितीचा स्रोत बनले आहे.
नेहमी समाजित साधणारे कदम अनेक पत्रकारांना अचूक आणि नेमक्या बातम्या त्यांच्या मार्फत कळवत असतात या संघटनेतील आपली जबाबदारी निर्विघ्नपणे आणि चोख बजावतील यात शंकाच नाही सिटीलाईन न्यूज परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.!
