नाशकातील अनेक पत्रकारांची उपस्थिती!
नाशिक दिनकर गायकवाड पालकांच्या कष्टाची सदैव
जाणीव ठेवा. मोठे ध्येय ठेवले तरच उतुंग यश मिळते.यशस्वी व्यक्तिमत्त्व होण्यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा. मोबाईल व नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा.निरोगी आयुष्यासाठी फास्ट फूड टाळा. नियमित व्यायाम आणि योग्य लाईफ स्टाईलमुळे आजारांना लांब ठेवता येते.
घरचे सकस अन्न घेतल्याने बुध्दी तल्लख होते. केवळ इंजिनियर, डॉक्टर न होता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करून पालकांचा, देशाचा अभिमान वाढवा,असे प्रतिपादन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुन्णालय मदत कक्षाचे प्रमुख डॉ. चैतन्य बैरागी यांनी नी केले.
नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा कुलथे मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी ८० पाल्यांबा साकार करण्यात आला. नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर,
दैनिक भ्रमर नाशिकरोड प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, दैनिक सकाळचे वितरण व्यवस्थापक बळीराम पवार, दैनिक लोकमतचे प्रमोद मुसळे, दैनिक दिव्य मराठीचे निलेश कुंभकर्ण, दैनिक पुढारीचे शरद धनवटे, दैनिक पुण्यनगरीचे कैलास बडगुजर, दैनिक सामनाचे आर. आर. पाटील, दैनिक लोकसत्ताचे प्रसाद क्षत्रिय, दैनिक तरुण भारतचे सचिन आडके, सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, राजेंद्र ट्रान्सपोर्टचे नाना कानो प्रमुख पाहूणे होते. गेल्या पंधरा वर्षापासून हा आगळावेगळा कौतुक
सोहळा होत असून तो राज्यात आदर्श त्याचे प्रतिपादन दना ठाकरे यांनी केले. दैनिक लोकमतचे निवासी संपादक अभिजित कुलकर्णी यांनी यावेळी सदिच्छा भेट दिली.
प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर यांनी प्रास्ताविक केले. यूरापत्र विक्रेते प्रताप गांगुर्डे यांची कन्या संजना डॉक्टर तर राजेंद्र थोरमिते यांची कन्या सुप्रिया वकील झाली. विजय विसपुते यांची कन्या वृष्टीता दहावीत ९५ टक्के गुण मिळाले.
त्यांच्यासह ८० गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लकी डॉ काढून बक्षीस वितरा करण्यात आले. यामध्ये उल्हास कुलथे यांच्या मातोश्री लिलाबाई यांच्या स्मरणार्थ दिपाली सोनार यांना चांदीचा गणपती व ज्योती थोरमिसे यांना बांदीचा करंडा देण्यात आला.
कल्पना परते, पूजा हसे, माया पोटे, मंगल सोनवणे, मनीचा निरभवणे यांना पैठणी मिळाली. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, रवि भोसले, खजिनदार योगेश भट, सचिव गौतम सोनवणे, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, महाराष्ट्र राज्य संघटनेचे
विभागीय सचिव महेश कुलचे, प्येह वृत्तपत्र विक्रेते विजय सोनार, किसोर सोनवणे, भारत माळवे, इस्माईल पठाण, विकास राहा, अनिल कुलथे, वसंत थोरे, हर्षल ठोसर, रवी सोनवणे आदींनी केले. महेश कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. गौतम सोनवणे यांनी आभार मानले. वृतपत्र विक्रेते आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
