परिसरातील दहशतीने नागरिक धास्तावले
नाशिक दिनकर गायकवाड येथील अंबड एमआयडीसी जवळील संजीवनगरमध्ये चार मोटारसायकली वरून आलेल्या दहा ते बारा तरुणांनी सारखओरडा करीत परिसरात दहशत माजवून रत्याने दिसेल त्याच्यावर चाकू, कोयते व लाकडी दांडयाने मारहाण केली. या प्रकारात दोघेजण जखमी झाले असून, एका सोसायटीतील पार्किंग मधील वाहनाचे या तरुणांनी काचा फोडून नुकसान केले. यामुळे परिसरात दहशत पसरली असून,पोलिसांनी तातडीने टवाळखोर व गुंडगिरीला आळा घालावा,अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
याबाबत मोहंमद फैसल वाहिद (वय २८, रा. संजीवन नगर पाण्याच्या टाकी जवळ अंबड लिंक रोड) यांनी अंबड एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.या तक्रारीत म्हटले आहे की .१ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेख हे संजीवनगर पाण्याच्या टाकी रस्त्याने जात असताना पाठीमागून चार मोटारसायकलवरून
माझ्या डाव्या कानावर व पाठीवर गंभीर दुखापत केली. त्याच प्रमाणे जोरजोरात आरडाओरडा करून हातात लोखंडी कोयते व बांबू येऊन रस्त्यात जो येईल,त्याला मारहाण सुरू केली.त्यात शेख यांच्या समोरच पाठीवर वार करून या तरुणांनी त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला.नंतर जवळच असलेल्या साईरुद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घुसून वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. त्याचा आवाज ऐकताच बिल्डिंगमधील रहिवासी खाली येताच हे टवाळखोर पळून गेले.
अमिरुल शेख व मोहंमद शेख यांना त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.तेथे प्रथमोपचार घेऊन मोहंमद शेख यांनी अंबड एमआयडीसी पोलीस चौकीत तक्रार नोंदविली.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहेत.
