श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील व शहरातील सतत पंधरा ते वीस तास तसेच वेळोवेळी दोन दोन तास वीज पुरवठा खंडित होत होता त्यामुळे श्रीरामपूरातील वीज ग्राहकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सर्व पक्षांच्या वतीने गंभीर इशारा तिला होता की १६ जुन दुपारी तीन वाजता महावितरण अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला होता परंतु याची दखल घेऊन महावितरण अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले असल्याची माहिती रिपाइंचे सुभाष त्रिभुवन यांनी दिली.
येथील लोकमान्य टिळक वाचनालय आझाद मैदान या ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या महावितरणच्या आढावा बैठकीसाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंता अजय भंगाळे तसेच उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे तसेच त्यांचे अन्य अधिकारी त्या
महावितरणच्या आढाव्या बैठकीसाठी येणार होते त्यामुळे श्रीरामपूरातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सततचा होणारा वीजपुरवठा खंडित का? होतो याचा जाब विचारून निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार होते
परंतु उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे यांनी आंदोलन करताना येथून पुढे वीजपुरवठा खंडित न होता सुरळीत वीजपुरवठा चालू राहील त्याचबरोबर यदा कदाचित वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची माहिती ज्या त्या भागातील वायरमन तसेच अधिकारी ग्राहकांना देतील तसे त्यांना आदेश दिले आहे म्हणून आपले होणारे आंदोलन स्थगित करावे असे त्यांनी लेखी पत्र रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड अझर पठाण अरबाज पठाण यांना लेखी पत्र दिलत्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
