श्रीरामपूर दिपक कदम- दिव्यांगांची सेवा हीच खरी जनसेवा व ईश्वर सेवा असते असा विचार नव्याने रुढ झाला आहे.अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सातत्यपूर्ण गेल्या २५ वर्षापासून प्रयत्न करणारे संजय साळवे यांच्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या ९९% मार्गी लागलेल्या आहेत.
दिव्यांगानी न्यूनगंड न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे.महाराष्ट्रातील श्रीरामपूर तालुका हा दिव्यांगांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरत आहे.असे प्रतिपादन दैनिक जय बाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी केले.
श्रीरामपूर शहरातील सामाजिक जाणीव असणारे निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी दिव्यांगांना सहाय्य केले आहे.संजय साळवे सातत्यपूर्ण अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवत आहे.
दिव्यांगा करिता ते देवमाणूस आहेत व आमच्यासाठी सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या विशेष सहकार्यातून भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना राबविली जाईल.असे प्रतिपादन यावेळी मा.नगरसेवक रवी अण्णा पाटील यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून केले.
निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताक तांबोळी,खजिनदार सौ.साधना चुडीवाल जिल्हाध्यक्ष विश्वास काळे,राज्य समन्वयक विनोद कांबळे,भारत मुक्ती मोर्चाचे सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताक तांबोळी यांनी केले तर आभार वर्षा गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतु मावरे,दिनेश पवार, सतीश साळवे,फिरोज शेख, सागर म्हस्के यांनी विशेष प्रयत्न केले.
