महानगरपालिकेतर्फे चिकुनगुनिया जनजागरण मोहीम

Cityline Media
0
पावसाळी वातावरणामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे मनपाचे आवाहन

नासिक दिनकर गायकवाड -सद्यस्थितीत पावसाळा
असल्याने नागरीकांनी डेंग्यू, चिकुनगुनिया रोगाचा प्रसार 'एडी या जातीध्या डासांमार्फत होतो.डासांची उत्पती सात दिवसांपेक्षा जास्त काळ साठवलेल्या घरगुती स्वच्छ पाण्याच्या साठ्यांमध्ये होते, त्या दृष्टीने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
डासांचा प्रादुर्भाव स्वच्छ साचलेल्या पाण्यामुळे होऊ शकतो व डेंग्यू मलेरिया, चिकुनगुनिया हा आजार होऊ शकतो. या पाण्याचे सर्व साठे उदा.टाक्या, बंगल्यावरील टाक्या,हौद,राजन ओव्हरहेड आदी घरातून एकदा स्वच्छ करून घासून पुसून कोरडे करावेत अळया

 आढळूनआलेले पाणी गटारात ओतू नये,तर जमिनीवर ओतावे साथ सदृष्य परिस्थिती असेल तेथे आठवडयातून एक दिवस 'कोरडा दिवस' पाळावा, फ्रिज मागील ट्रे,कुलर,फिशटँक, एसी इक्ट, लिफ्ट यामध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी,फुलदाणी, चायनीज

बांबू,मनिप्लांट, इतर गोभिवंत झाडांमधील पाणी दिवा कुंडी खालील असलेल्या प्लेट मधील पाणी काढून कोरडे करावेत.पशु पक्षांसाठी माणवठे दररोज स्वच्छ करून कोरडे करावेत. पाण्याची टाकी बंदिस्त ठेवावी किंवा कापडाने बांधून ठेवावीत रिकामे पिंप,भांडी कोरडी

राहतील सुरु असे ठेवावीत किंवा आवश्यक नसेल तर पालथे करून ठेवावेत, रिकामी भांडे इत्यादी परीसरात फेकु नये.टेरेस मध्ये  गॅलरीत कोणात्याही प्रकारचे भंगार वस्तु जुने डबे, टायर्स, नारळाच्या करवंट्या ठेऊ नयेत.या वस्तूंची विल्हेवाट लावावी नवीन बांधकामात पाणी साठू देऊ नका.

तसेच मेसमेंट, लिफ्ट क्लीक नावाने पावसाचे पाणी परीसरात साचू देऊ नये, पाणी साचल्यास त्यात काळे ऑईल टाकावे करंजा, पडित विहीर, कमळ कुंडी, टाक्या आदी न रिकामे होणाऱ्या पाणीसाठा कधी सोडावेत. घर, बंगला, सोसायटी,शाळा,महाविद्यालये, दवाखाने

 शासनाची कार्यालये, कारखाने,दुकाने इतर सर्व कार्यालयातील टेरेस व परिसरातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावा न्हालीतील पावसाचे साठलेले पाणी नियमितपणे काढावे, सेप्टीक टैंक पुर्णपणे बंदिस्त कराव्यात व व्हेट पाईपला जाळी लावण्यात यावी,तर व 

परिसर नियमित तपासा, स्वच्छ करा आणि पाणीसाठा झाकून ठेवा. या प्रमाणे काळजी घेतल्याने डेग्यू, चिकनगुनिया व मलेरिया वा आजारावर निश्चित नियंत्रण करणे शक्य होईल,या आजाराला हद्दपार करण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे निवेदनात म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!