श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर बेलापूर परिसरातील गोखलेवाडी या ठिकाणच्या श्री.साई विठ्ठल अनाथ आश्रम येथे नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु विमान अपघात दुर्दैवी घटनेमुळे नामदार विखे पाटील यांच्या सूचनेनुसार वाढदिवस साजरा न साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना सूचनाही या पद्धतीने सुचविण्यात आल्या होत्या कुठल्याही प्रकारचा मोठा जल्लोष न करता कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अनाथ आश्रम या ठिकाणी अन्नदान ' रक्तदान . वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना गणवेश ' शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात यावे अशा सूचना नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी जाहीरपणे आदेश दिल्याने श्रीरामपूर येथील अनाथ आश्रम या ठिकाणी अन्नदान व शालेय साहित्य वाटप वृक्षारोपन कार्यक्रम करण्यात आला
प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड मा.नगराध्यक्ष संजय फंड नगरसेवक आशिष धनवटे, संजय गांगड, भाजपा नेते बंडूकुमार शिंदे व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र छाजेड शहराध्यक्ष व भाजपा पदाधिकारी यांनी केले यावेळी आश्रमातील बालगोपाल लहान मुलांशी संवाद साधण्यात आला
तर उपस्थित सर्व मान्यवरांचे ह. भ.प.कृष्णानंद महाराज तसेच ज्ञानेश्वर महाराज आढाव यांनी आभार मानले.
