आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात निझर्णेश्वर महादेव फाट्यावर साई भक्तांची ट्रॅव्हल बस व आंबे वाहतुक करणाऱ्या मालट्रकचा रविवार सकाळी सहा वाजता झालेल्या अपघातात ३ ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोल्हार घोटी राज्यमार्गावर कोकणगाव शिवारात रविवारी सकाळी सहा वाजण्याचा सुमारास निझर्णेश्वर महादेव फाट्याजवळ साई भक्तांची ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच ४६सी यु २७५४ हि बस संगमनेर कडुन लोणी कडे जात असतांना व लोणी हुन संगमनेर कडे आंबे घेऊन जात असलेल्या मालट्रक क्रमांक एम एच १२ एम एक्स १४५४ चा वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने समोरा समोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात प्रवीण सोपान कांदळकर (वय २८ )राहणार सुकेवाडी संगमनेर,फिरोज लाला शेख (वय. ४६) राहणार कासारा दुमला संगमनेर,अंजुम प्रवीण वालमीकी (वय ३९) पाणीपत हारीयाणा हे तिघे ठार झाले तर हर्षिता सोनु वाल्मिक, पुनम बिर्ला,सोनिया बिर्ला, रिया चावरिया,ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील लत्ता सुरेश चक्रनारायण सर्व राहणार मुंबई, प्रथमेश राजेंद्र कोल्हे पोहेगाव ता कोपरगाव, मोहम्मद रफिक शेख नाईकवाडापुरा संगमनेर हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आपघाताचे वृत्त संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास समजताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस हेड काॅन्सटेबल राजेंद्र लांगे,हेड काॅन्सटेबल आशिष आठवडे,पोलीस हेड काॅन्सटेबल सचिन उगले,पोलीस नाईक धनंजय महाले हे तातडीने घटनास्थळी दाखल होत स्थानिक ग्रामस्थांच्या मदत्तीने जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवले.
