मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क कांटा लगा... या गीतावर केलेल्या अप्रतिम नृत्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचा रात्री आकस्मिक मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
४२ वर्षीय शेफाली जरीवाला हिया मृत्यू हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अस्पष्टता निर्माण झाली आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेफाली जरीवाला हिचा मृतदेह अंधेरी परिसरात असलेल्या तिच्या घरात सापडला.याबाबत रात्री एक वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. तसेच तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा संभ्रम वाढला आहे. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच तिध्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. शेफाली जरीवाला हिने तिच्या अप्रतिम अभिनय आणि सॉंग प्रदर्शन प्रेक्षकांची मने जिंकली होती. सन २००२ मध्ये तिथे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. या गाण्यातील नृत्याने तिला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. याशिवाय, तिने अनेक मालिकांमध्येही अभिनय केला होता.
दोन दिवसांपूर्वी शेफालीला तिच्या पती समवेत पाहिल्याचे वॉचमनने पोलिसांना सांगितले. दरम्यान तिचे काल निधन झाल्याचे
ऐकून त्यांना विश्वास बसला नाही. शेफाली जरीवाला यांच्या निधनाने मनोरंजन सुष्टीवर शोककळा पसरली आहे. तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.