नाशिक दिनकर गायकवाड अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडून तिच्याशी वारंवार शरीर सबंध ठेवून तिला गरोदर करून तिच्या पालकांना शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित फिर्यादी ही अल्पवयीन आहे, पिढीतेला एप्रिल २०२४ ते २४ जून २०२५ या कालावधीत तिच्या पतीने जिवे ठार मारण्याची धमकी दिली,तसेच पीडितेला तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेले,तसेच पीडितेचे सासरे हे पंचायतीचे मुखिया आहे.
त्यांनी फिर्यादीच्या परिवाराला समाजातून बेदखल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीला २५ वर्षाच्या मुलासोबत जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले.पिढीतेच्या पतीने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले.त्यातून फिर्यादी ही गरोदर राहिली. तिला दि.१ जून रोजी मुलगा झाला. त्यानंतर फिर्यादीची सासू व जेठानी फिर्यादीला विनको वारणावरून शिवीगाळ करून मारहाण करीत असत, सासू सासरे -दीर यांनी पीडितेला शिवीगाळ करून "तुझ्या घरच्यांना समाजात राहणे - मुश्कील करू, अशी धमकी दिली. हा प्रकार दत्तगर, अंबड येथे घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस जाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.