नाशिक दिनकर गायकवाड- समाजकल्याण विभागांतर्गत निफाड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,रसलपुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
वस्तीगृहांच्या कार्यालयात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून, वस्तीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील विद्याथ्यांनी hmas mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत,असे आवाहन वसतिगृहांचे गृहपाल एन.रही. मेधणे यांनी प्रसिद्धि पत्रकान्वये केले आहे.
निफाड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह, रसलपूरसाठी अनु. जाती प्रवर्गासाठी शालेय रिक्त २९ जागा, कनिष्ठ महाविद्यालय ६ रिक्त जागा, वरीष्ठ महाविद्यालय रिक्त ८ जागा व्यावसायिक रिक्त ९ जागा आहेत. अनु.जमाती प्रवर्गासाठी व्यावसायिक रिक्त १ जागा, विजाभज प्रवर्गासाठी शालेय रिक्त जागा, विमाप्र प्रवर्गासाठी शालेय रिक्त १ जागा, वरिष्ठ महाविद्यालय रिक्त जागा अशा एकूण ५६१ रिक्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,लासलगावसाठी अनु. जाती प्रवर्गासाठी शालेय रिक्त १३ जागा, कनिष्ठ महाविद्यालय रिक्त ११ जागा, वरिष्ठ महाविद्यालय रिक्त १० जागा आहेत. अनु. जमाती प्रवर्गासाठी शालेय रिक्त जागा, विजाभज प्रवर्गासाठी कनिष्ठ महाविद्यालय रिक्त १ जागा, इमाय, आ. दू. मा. प्रवर्गासाठी वरिष्ठ महाविद्यालय रिक्त १ जागा व विमाप्र प्रवर्गासाठी शालेय रिक्त
जागा, अशा एकूण ३८ रिक्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत दोन्ही वस्तीगृहे शासकीय
इमारतीत कार्यरत असून, सुसज्ज सोयी-सुविधांनी युक्त इमारत आहे. निवाऱ्यासह विद्याथ्यांना चांगल्या प्रतीचे भोजन, निर्वाह भत्ता,स्टेशनरी रक्कम, छत्री व गमबूट रक्कम, शैक्षणिक सहल रक्कम आदी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी ०२५५०-२६७०१८, २२४१९११ या दूरध्वनीवर व ८९९९३९१२३७वा भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
