वैमानिकाने नियम सांगुन उपमुख्यमंत्र्यांच्या विमान उड्डाणास दिला नकार

Cityline Media
0
जळगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील वैमानिकाने विमान उड्डाणासाठी नकार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर अडकले. एकनाथ शिंदे यांना जवळपास ४५:मिनिटे विमानतळावर ताटकळत राहावे लागले, त्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची शिष्टाई फळाला आली असून एकनाथ शिंदे यांच्या विमानाने नंतर उड्डाण केले.
वैमानिक सलग १२ तासांपासून विमान उडवण्याचे काम करत होता. त्याच्या प्रकृतीला आणि तांत्रिक नियमांनुसार अधिक काम करणे शक्य नव्हते. यामुळेच, वैमानिकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान उडवण्यास नकार दिला.

या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी,स्वतःउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी वैमानिकाशी चर्चा केली.त्यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.अखेर, या चर्चेनंतर वैमानिकाने विमान उडवण्यास होकार दर्शवला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. लाडक्या बहिणीने अनुभवली कॉमन मॅनची माणूस्की
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकीचे दर्शन अनेकांनी अनुभवले आहे. काल शिंदे हे जळगाव दौऱ्यावर होते.किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला निघालेल्या जळगावच्या रुथ्था महिलेला स्वतःच्या विमानात घेऊन जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅनचे दर्शन घडविले.

किडनी उपलब्ध झाल्यामुळे तातडीने रुग्ण महिला मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. मात्र विमान निघून गेल्यामुळे जाण्यास अडषण येत होती, वेळेत पोहोचणे महत्त्वाचे होते.मंत्री गिरीश महाजन,गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजती.त्यानंतर कुठलीही सबब न देता. 

आधीच उशीर झाला असताना सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्ण महिलेची विचारपूस करत तिला स्वतःच्या विमानात जागा उपलब्ध करून मुंबईला आणलं. विशेष म्हणजे मुंबईला उत्तरल्यानंतर रुग्णालयापर्यंत या महिलेला रुग्णवाहिका सुद्धा तयार ठेवण्यात आली होती.

गेल्या आठ वर्षापासून किडनीच्या आजाराने बहीण त्रस्त आहे. त्यामुळे ती किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतिक्षेत होती. आज अखेर किड़नी उपलब्ध झाल्याने तातडीचा फोन आला. त्यानुसार ती निघाली; मात्र उशीर झाल्यामुळे विमान निघून गेले. दुसरी व्यवस्था नसल्याने मुंबईला वेळेत पोहोचणे अशक्य होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवासारखे धावून आले. या रुग्ण महिलेचा भाऊ जितेंद्र पाटील याने एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!