माजी केंद्रीय मंत्री डॉ. पवार : यंत्रणा उभारण्यासाठी ४.२० कोटींची तरतूद
नासिक दिनकर गायकवाड महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या हितासाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याला मान्यता दिली असल्याची माहिती माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
एन. डी. पटेल रोड येथील वसंत स्मृती भाजपा पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, यापूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी एकत्र आयोग स्थापन केला गेला होता. मात्र सुसूत्रतेसाठी हे दोन्ही आयोग स्वतंत्र करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.
अखेर आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उड़के यांच्या प्रयत्नामुळे या मागणीला मान्यता देऊन ती प्रत्यक्षात उतरली गेली आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आला असून त्यात एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्यांचा समावेश राहणार आहे. आयोगाच्या कार्यासाठी २६ पदांची निर्मिती कार्यालयीन जागा कर्मचारी आवश्यक सुविधा आणि यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे ४.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या आयोगाची स्थापना आणि कार्यपद्धती ही स्वतंत्र राहणार असून ही महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या नावाने आरबीआय कार्यान्वित होणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
या आयोगाच्या स्थापनेमुळे अनुसूचित जमाती समाजाच्या प्रश्नांवर थेट आणि तातडीने निर्णय घेता येणार आहेत. शिक्षण,आरोग्य, रोजगार, जमीन, पाणी, रहिवासी आणि योजनांची अंमलबजावणी यासारख्या क्षेत्रातील अडीअडचणींचा वेळीच मागोवा घेऊन ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहे. विशेषतः शासनाच्या विविध योजना आणि सवलती आदिवासी समाजापर्यंत पोहोचवतात की नाही, यावर आयोग बारकाईने लक्ष ठेवेल आणि गरजूंना न्याय मिळवून देईन. आदिवासी समाजातील लोकांनी अनेक वेळा आपल्या समस्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले, पण आता त्यांना एक स्वतंत्र मंच उपलब्ध होणार आहे.
आदिवासी समाजासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूषित जमाती आयोगाची स्थापना म्हणजे पिवधान पिवद्यांच्या प्रतीक्षेला मिळालेला पूर्णविराम असून स्वतंत्र आयोगाबी स्थापना म्हणजे ऐतिहासिक टप्पा ठरला असल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित बच्छाव, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रदेश प्रवक्ते सक्ष्मण सावजी, ज्योती कवर, गोविंद बोरसे, ॲड. शाम बडोदे आदी उपस्थित होते.
