वरवंडी संपत भोसले पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरेत सहकाराची पंढरी निर्माण केली तसेच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बरोबरीने प्रवरा चाळीसक्रोशीत शिक्षणाची गंगोत्री वाहती केली तिचा प्रवाह आजतागायत सुरुच आहे.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आज राज्य देश अन् विदेशात देखील चमकत आहे.त्यात आज वरवंडीकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे येथे माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे काम सुरू होण्याचे संकेत येथील एका कार्यक्रमामुळे मिळाल्याने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील वरवंडी गावात प्रवरा माध्यमिक विद्यालय आहे या शाळेची स्थापना १९९२ ला झाली यावेळी गावातील जेष्ठ नागरिक मारुती जिजाबा गागरे यांनी आपल्या राहत्या घराच्या खोल्या देऊन शाळेला सुरुवात केली. या साठी गावातील नागरिक
दिवंगत.रामजी तान्हाजी वर्पे ,संपत काशिनाथ वर्पे, दिवंगत.लक्ष्मण नामदेव पाटोळे,(लखाबाबा) यांनी तत्कालीन खासदार पद्मभूषण दिवंगत.डॉ.बाळासाहेब विखे यांची भेट घेऊन प्रामुख्याने शाळेसाठी प्रयत्न केले व वरवंडी गावात शाळा सुरु केली या नंतर दिवंगत.रोहिदास राजाराम गागरे हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष ठरले.
यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांसमवेत शाळेची नवीन खोल्या बांधून शाळा १२वी विज्ञान पर्यंत नेली परंतु या खोल्या आता मोडकळीस आल्या आहेत.नवीन अध्यक्ष.एकनाथ मुरलीधर वर्पे हे अध्यक्ष होताच यांनी पाठपुरावा केला व नवीन खोल्यांची मागणी केली .
दरम्यान गावातील दिवंगत. पुंजाबाई अप्पासाहेब जाधव यांच्या मालकीची सुमारे ९० गुंठे जमीन संस्थेला दान दिली होती परंतु काही कारणांनी त्या ठिकाणी इमारत उभी राहू शकली नाही .
नुकतेच प्रवरा माध्यमिक विद्यालय या ठिकाणी एका सत्कार सोहळ्यात गावातील नागरिकांनी प्रवरा माध्यमिक शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.लिलावती सरोदे यांच्याकडे शाळेची मागणी केली असताना त्यांनी लगेचच जागेची पाहणी करून जागेला कंपाऊंड करायचे असे आदेश दिले व पुढील काही दिवसात या ठिकाणी नवीन इमारत उभी राहील असे आश्वासन दिले .ग्रामस्था मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले यावेळी वरवंडी शाखेचे अध्यक्ष एकनाथ वर्पे ,भाजपा युवा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले,अल्पसंख्यांक समाज अहिल्यानगर रऊफ शेख, खांबा सरपंच खांब रविंद्र दातीर, सोसायटी अध्यक्ष राजा बापू वर्षे, रिपाइंचे पठारभाग विभाग प्रमुख सागर शिंदे, विठ्ठल भोसले. नारायण वर्षे मच्छिंद्र गागरे, किसन वर्षे, बापूसाहेब वर्षे, मारुती गागरे, कैलास वर्षे, संतोष वर्षे, तुळशीराम पाटोळे, दत्तात्रय वर्पे, सद्दाम शेख, राज पाटोळे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.