शेतकऱ्यांचा मानसिक गोंधळ
नाशिक दिनकर गायकवाड पीएम खात्याच्या बनावट लिंकेने दिंडोरी येथील एका शेतकऱ्याच्या खात्यावरुन पैसे अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिंडोरी येथील शेतकरी शांताराम जाधव यांच्या पोस्टातील खात्यावर अनेक दिवसांपासून पीएम योजनेंचे पैसे येत होते. परंतू त्यांच्या मोबाईलवर पीएम खात्याच्या बनावट लिंक आल्यावर त्यांनी ती ओपन करताच त्यांच्या पोस्टातील खात्यावरुन दहा हजार रुपये कट झाले.
त्यांनी तत्काळ पोस्ट कार्यालयात जावून आपले खाते बंद करण्याची मागणी केली.त्यावेळी पोस्टातील
कर्मचाऱ्यांनी तत्काळ खाते बंद करुन जाधव या शेतकऱ्याचे पुन्हा पैसे कट करण्यापासून वाचवले.परंतु त्यांना दहा हजार रुपयाचा आर्थिक फटका बसला आहे. जाधव यांचे खाते बंद केले असले तरी त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळे मॅसेज सुरु आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये वेगळे संभ्रम निर्माण होत आहे.
तरी शासनाने याची दखल घेवून बनावट लिंकवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जाधव शेतकरी कुटुंबीयांनी केली आहे. तसेच आधी पोलिस प्रशासनाकडून अनेक वेळा शेतकऱ्यांना या बनावट लिंकद्वारे माहीती व व्हिडीओ शेअर करुन शेतकऱ्यांना बनावट लिंक डाऊनलोड करु नये, असे आवाहन करण्यात आले होते. तरी काही शेतकऱ्यांकडून चुकून ही लिंक डाऊनलोड होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची या बनावट लिंकव्दारे लुट होण्याचे प्रकार वाढत चालले आहे. तरी या बनावट लिंकचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.