पिंपळगाव बसवंत पोलिसांचे सामाजिक सामाजिक कार्य कौतुकास्पद
नाशिक दिनकर गायकवाड- पोलीस समाजाचा एक आवश्यक आणि महत्वपूर्ण भाग आहेत ते आपले कर्तव्य दक्षतेने निभवत असतात ते केवळ एक मशीन नाहीत त्यांच्यात एक संवेदनशील माणूस दडलेला असतो ज्याला भावना आहे समाजाप्रती कळकळ व जाण आहे या खाकी वर्दीतही संवेदनशील मनाची व्यक्ती असते.ड्यूटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो.अशाच खाकी वर्दीत दडलेल्या दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.पतीसह सासरच्या व माहेरच्या व्यक्तींकडून त्रासलेल्या एका मातेला तिच्या दोन चिमुकल्या मुलींना मायेचा आधार देत वर्दीतील माणुसकीची ओळख करून दिली.
गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव बसवंत शहरातील मंदिर परिसरात एक महिला तिच्या पाच-सहा वर्षीय दोन चिमुकल्या मुली सामाजिक कार्यकर्त्यांना आढळल्या. दरम्यान,सामाजिक कार्यकर्ते दत्तू झनकर व त्यांच्या मित्रांनी त्यांना पिंपळगाव पोलिसांशी संपर्क साधत त्यांच्या स्वाधीन केले.त्यानंतर पोलिसांनी तिची
विचारपूस केली असता सदर महिला पनवेल येथील असल्याचे समोर आले.पतीसह सासरची आणि माहेरची मंडळी तिला शारीरिक,मानसिक त्रास देत होती. घराबाहेर काढल्याने तिची दोन्ही मुलींसह जिल्ह्यात भटकंती सुरू होती.मुलींच्या काळजी पोटी आता पतीकडे आणि माहेरी जायचे नाही,असे तिने पोलिसांना सांगितले.
अखेर पोलिस निरीक्षक तिवारी यांनी मुलींना शाळेत जाल का? तेव्हा आम्हाला सुद्धा पोलिस आणि डॉक्टर व्हायचे आहे असे त्या दोघींनी सांगितले.त्या दोघींचे बोलणे ऐकून पाणावलेल्या डोळ्यांनी तिवारी यांनी येवल्यातील सँगऋषी वृद्ध अनाथाश्रमास संपर्क साधला व निराधार महिलेसह तिच्या दोन्ही मुलींना अनाथाश्रम पदाधिकाऱ्यांकडे स्वाधीन करून त्यांना मायेचा आधार दिला. यावेळी पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्यासह सँगऋषीं वृद्ध अनाथाश्रमाचे नवनाथ जऱ्हाड, गोकुळ खैरनार, विकास वाळुंज, शुभम उगले, दत्तू झनकर, उर्मिला काठे, सविता धामणे आदी उपस्थित होते.
पालकांनी कौटुंबिक नात्यात क्लेश निर्माण करू नये
सध्या कौटुंबिक वादातून अनेक असे प्रकार घडत असून, निष्पाप चिमुकल्यांचे भविष्य संपुष्टात येत आहे. पालकांनी कौटुंबिक नात्यात क्लेश निर्माण करण्याअगोदर आपल्या मुलांचा आणि परिवाराचा विचार करावा.
दुर्गेश तिवारी, पोलिस निरीक्षक
निराधार मुलींचे स्वप्न सैंगऋषी वृद्धाश्रम पूर्ण करेल
पिंपळगाव पोलिसांमार्फत एक निराधार महिला व तिच्या दोन चिमुकल्या मुली आल्या आहेत. दोन चिमुकल्या मुलींचे पोलिस आणि डॉक्टर व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
नवनाथ जऱ्हाड, संस्थापक, सैंगऋषीं
