नाशिक दिनकर गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मा.मंत्री धनंजय मुंडे हे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मधल्या काळामध्ये पडद्याआड राहिलेले मुंडे आता नागरिकांमध्ये विविध कार्यक्रमांसाठी सहभागी होत असल्याचेही या निमित्याने समोर येत आहे.
सविस्तर वृत्त असे की,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मा.मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून सतत त्यांनी वेगवेगळ्या संकटांमध्ये सापडत आहेत बीड मधील हत्याकांडानंतर सातत्याने होत असलेले आरोप यामुळे मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर मागच्या आठवड्यामध्येच धनंजय मुंडे हे नाशिक जिल्ह्यातील
इगतपुरी तालुक्यातील विश्यपना केंद्रामध्ये दाखल झालेले होते. या ठिकाणी मनशांतीसाठी त्यांनी १० दिवस राहिले होते.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मा. मंत्री धनंजय मुंडे हे रामकुंड येथे दशक्रिया विधीसाठी दाखल झालेले होते. या ठिकाणी वस्त्रांतर गृहामध्ये दुसऱ्या मजल्यावर ते देशमुख यांच्या दशक्रिया विधीसाठी ते हजर राहिलेले होते. त्यानंतर मुंडे हे सिन्नर येथे एका विवाह सोहळ्याला देखील दुपारी हजेरी लावणार होते
