वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नुकतीच सुरू झाली असता या येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेमध्ये स्वागत करण्यात आले.
त्याचप्रमाणे गुणवत्तेसाठी अव्वल असलेल्या वंरवंडी शाळेमध्ये नवीन मुलांनी प्रवेश घ्यावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गावातील नागरिक व परिसरातील नागरिकांना आव्हान करण्यात आले.यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षांच्या वतीने शाळेमध्ये असणाऱ्या नागरिकांना देखील यावेळी आवाहन करण्यात आले.
वरवंडीच्या शाळेमध्ये उत्कृष्ट असे खेळण्यासाठी क्रिंडागण आहे शाळेमध्ये चार उत्कृष्ट शिक्षक तसेच सोयीसाठी दोन इंटरॅक्टिव पॅनल चार एलईडी टीव्ही फॅन एक प्रोजेक्टर सुलभ शौचालय त्याचप्रमाणे २४ तास वीज इतकी सुख सुविधा असताना देखील ग्रामिण
भागातील लोकांचा इंग्रजी माध्यमांकडे कल दिसतोय त्यांचे भरमसाठ असलेले शुल्क सोयीची न होणारी विद्यार्थ्यांची बसव्यवस्था मुलांवर पाश्चात्य संस्कृतीचे होणारे संस्कार अशा एकंदरीत अनेक अडी अडचणी असताना मराठी माध्यमाचा पर्याय केव्हाही सर्वोत्तम
इंग्रजी माध्यमांमध्ये असलेल्या भौतिक सुविधा आता वरवंडी गावातील जिल्हा परिषद शाळेत देखील मिळत आहे तरीसुद्धा गावाकडील पालकांचा कल काहीसा इंग्रजी माध्यमाकडे वळलेला दिसतोय पालकांनी हे लक्षात ठेवावे की लहान मुलांना स्वप्न देखील मराठीत पडतात आणि मराठीतूनच आपल्या मुलांचा मनोविकास वाढेल.
आता इंग्रजी माध्यमा प्रमाणेच मराठी शाळेत देखील या सुविधा उपलब्ध आहे तसेच येथील शिक्षकही उच्चशिक्षित, कर्तव्यदक्ष व जबाबदार आहे इंग्रजी व गणित या विषयावर त्यांची पकड आहे उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षण वरवंडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मिळत आहे तरी गावकरी आणि पंचक्रोशीतील सर्व पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी या शाळेत निश्चित करावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने करण्यात आले
