नाशिक दिनकर गायकवाड सिन्नर तालुक्यातील खंबाळे ते दोडी बु या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हा रस्ता प्रवासा योग्य राहिला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर्जाहीन कामामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय या रस्त्यावरील खडी डांबर निखळून पडले आहे अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे असे चालू कामे तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचार हाच शिष्टाचार व्हावा असे लोक यानंतर बोलु लागले आहे.
म्हणून खंबाळे ग्रामस्थांच्या वतीने १ जुलै २०२५ सकाळी दहा वाजता या खेळ खंडोबा झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
खंबाळे ते दोडी बु या रस्त्याची गेल्या ६-७ वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.हा रस्ता म्हणजे खडयात रस्ता की रस्त्यात खड्डा असे निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे.या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, रुग्ण,शेतकरी व प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात.शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही.त्यामुळे निषेध व जागरूकतेचा भाग म्हणून आम्ही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे असे असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले
या आंदोलनातून आम्ही शासनाचे लक्ष वेधून घेण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचाही संदेश देणार आहोत.आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी खंबाळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.