एकाच वेळी मनमाड मधील तीन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी साडेदहा किलो गांजा केला जप्त

Cityline Media
0
मनमाडच्या गांजा छाप्यात एका महिलेसह तिघांना अटक

नाशिक दिनकर गायकवाड नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात अंमली पदार्थाची वाढती विक्री लक्षात घेता पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एकाचवेळी तीन ठिकाणी छापे टाकून सुमारे साडे दहा किलो गांजा जप्त केला आहे. यामध्ये एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून जात गांज्याची एकूण किंमत १ लाख २ हजार १६० रूपयांची असल्याची माहिती मनमाड शहर पोलीस ताण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक विजय करे यांनी या कारवाई बाबत माहिती दिली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मादक पदार्थ विक्री विरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर ही विशेष मोहीम राबवण्यात आली

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मनमाड शहरातील विविध भागात गांजाची विक्री सुरू होती.एका ठिकाणी छाया टाकल्यानंतर इतर विक्रेत्यांना माहिती मिळू नये म्हणून ही मोहीम अत्यंत गुप्तपणे राबवण्यात आली. यासाठी तीन स्वतंत्र पथकांची रचना करण्यात आली होती. ही पथके एकाच वेळी तिन्ही ठिकाणी रवाना झाली आणि छापेमारी यशस्वी झाली. याप्रकरणी संदीप

उर्फ धोंडू देविदास व्यवहारे (वय ५०, रा.मुक्तांगण, मनमाड) जप्त गांजा ३ किलो ६६० ग्रॅम बाजार मूल्य ३०,६६० रुपये, तुकाराम देवबा गवली (वय ५० वर्ष, रा. गवळीवाडा, मनमाड) जप्त गांजा ५ किलो १४० बाजारमूल्य ५१,४०० रुपये इरफाना रऊफ पठाण, (वय ३५ वर्ष रा. हुसैनी चौक, टकर मोहल्ला, मनमाड) जात गांजा २ किलो १०  ग्रॅम बाजार मूल्य २०,१०० रुपये असा एकूण साहे दहा किलो गांजा जात आहे. या तिघांविरुद्ध मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गांज्याचा स्त्रोत, यामागचे रकेट आणि इतर कोणत्या यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस

मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये खालील अधिकारी व कर्मचायांचा मोलाचा सहभाग होता हेमंत भंगाळे भारत जाधव, कौशल वाघ, प्रतिक भिंगारदे,

विजय शिंदे, इमदाद सय्यद अशोक व्यापारे, दिलीप शिंदे, शिवाजी कापडणे, पंकज देवकाते, संदीप झाल्टे, रणजित बव्हाण, राजेंद्र खैरनार, अशोक भाबड, अभिजीत उगलमुगले, दिपाली आव्हाड, संगिता बाधपाडे, मनिषा उंबरे, मालिनी अंभोरे आणि प्रतिक्षा पवार होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!