लोकजागृती सामाजिक संस्थेचा पुढाकार
निघोज सिटीलाईन न्यूज नेटवर्क पारनेर तालुक्यातील लोकजागृती सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने
जागा व दुकान गाळ्याचे व्यवहारातुन मंगेश ससाणे व भास्कर कवाद यांचेत निर्माण झालेला तंटा सामोपचाराने मिटवण्यात आला.कागदपत्रे व रेकॉर्डच्या पुर्तते अभावी तांत्रिक अडचण असल्यामुळे हा व्यवहार सहा वर्षांत पूर्ण झाला नाही. त्यातुन वाद उद्भभवला, स्थानिक पातळीवर वाद मिटला नाही आणि तंटा पारनेर पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला. मंगेश ससाणू यांनी लोकजागृती सामाजिक संस्थेकडे संपर्क साधला,
संस्थेचे अध्यक्ष अँड. रामदास घावटे यांनी दोघांची भुमिका ऐकुण मध्यस्थी करत सामोपचाराने तंटा मिटवण्याचा योग्य प्रस्ताव दोघांसमोर ठेवला, त्याला दोघांनाही मान्यता देवून सहमती दर्शवली.व पारनेर
येथे दुय्यम निबंधक कार्यालयात सहमतीने दस्ताची नोंदणी रद्द करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. व परस्पर विरोधातील दाखल तक्रारी / फिर्यादी मागे घेतल्या.
यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडागळे, दुय्यम निबंधक गायकवाड ,भुमी अभिलेखचे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद,शिवाजी लंके यांनी सहकार्य केले.
