नाशिक दिनकर गायकवाड राज्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात शिवसेना (ठाकरे गट) प्रत्येक चौकात व प्रभागात नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविणार आहे. या स्वाक्षऱ्या राष्ट्रपती व पोलीस महासंचालकांना पाठविण्यात येणार आहेत. मतदारांच्या भावना समजून घ्या,जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा, महापालिकेची निवडणूक जिंकून शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा,असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी केले.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची बैठक जेलरोड येथे झाली.त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी या बैठका होत आहेत. पदाधिकारी सुनील बागूल, खा. राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मा.आमदार वसंत गिते, कोअर कमिटीच्या सदस्या भारती ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख भैया मणियार, सचिव
मसूद जिलानी, पूर्व विधानसभाप्रमुख राहुल दराडे, विधानसभा संघटक विशाल कदम, सुनील जाधव, समव्ययक योगेश गाडेकर, उपमहानगर प्रमुख सागर भोजने, कुलदीप आढाव, मा.नगरसेवक सुनील बोराडे, शिवा गाडे, कल्पेश बोराडे, प्रशांत भालेराव, रतन बोराडे, योगेश नागरे, उमेश शिंदे, सिंधू पगारे, दिनकर आढाव, चंद्रकांत चव्हाणके आदी उपस्थित होते.
खा. राजाभाऊ वाजे म्हणाले, की महापालिका निवडणूक शिवसेना लढविणार, जिंकणार. महापौर शिवसेनेचाच झाला पाहिजे यासाठी सर्वांनी कामाला लागावे. सुनील बोराडे यांनी प्रास्ताविक केले. कुलदीप आढाव यांनी सूत्रसंचालन केले.
