शासकीय अधिकाऱ्यांच्या घोड चुकीमुळे पठार भागातील ठेकेदार मस्तवाल
वरवंडी खांबे डांबरी रस्त्याचा मोबाईल कंपनी वाल्यांनी केला खेळखंडोबा
गुन्हा दाखल करण्याची ग्रामपंचायतची मागणी
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी एअरटेल कंपनीचे काम घेतलेले ठेकेदार यांनी वरवंडी खांबा या डांबरी रस्त्याच्या साइड पट्ट्या उकरून त्यावर माती टाकून चांगल्या डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था करून टाकली आहे.पाऊस चालू असताना देखील हा रस्ता खोदण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांच्या मुक सहमतीने सुरू आहे या खोदकामामुळे येथील चांगल्या रस्त्याचा खेळ खंडोबा झाला आहे.
सदरील बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी ते काम बंद केले व सदरील माहिती गावचे सरपंच सौ.किरण गणेश गागरे.यांना देण्यात आली व कामा बद्दल विचारले असता असे लक्षात आले की हे काम अनाधिकृतरित्या विना परवाना चालू आहे वरवंडीचे
ग्रामसेवक भाऊसाहेब कराळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी देखील मला याबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले ग्रामसेवक येईपर्यंत हे काम बंद ठेवण्यात आले ते आल्यानंतर काम करत असलेले ठेकेदार यांचे कामगारांनी अमोल दातीर यांना बोलून काम बंद ठेवण्यास सांगितले व केलेले खड्डे आणि उत्खनन बुजण्यास सांगत मुरुम टाकून साईट पाट्या पूर्ववत करण्यास सांगितले.परंतु ठेकेदार यांनी ग्रामपंचायतीच्या आदेशाला धुडकावत पुन्हा रस्त्याचे नुकसान करत आपले कंपनीचे काम पूर्ण केले व साइड पट्ट्या तशाच उकरलेल्या अवस्थेत ठेवल्या त्याचा परिणाम त्या साइड पट्टी मध्ये शाळेची एक गाडी व ट्रॅक्टर अडकला या सर्व प्रसंगाची चित्रफीत ग्रामस्थ व अधिकाऱ्यांकडे उपस्थित आहे .
संबंधित माहिती वरवंडीचे ग्रामसेवक यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व उपअभियंता सुखदेव नावजी मरभळ यांना अर्जाद्वारे यांना दिली त्यांनी तात्काळ या जागेवर येऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर ते पाहणीसाठी आले त्यांनी ग्रामसेवक सरपंच यांच्या समवेत येथील पाहणी देखील केली त्यानंतर सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते असा दिलासादायक आशावाद निर्माण केला परंतु आज चार दिवस उलटून गेले तरीही अद्याप पर्यत वरवंडी खांबे रस्त्याचा इस्कोट करणाऱ्या ठेकेदारावर कुठलीही कारवाई झालेली नाही.
याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की या ठेकेदाराने खांबे या ठिकाणी देखील असेच चुकीचे काम केले होते त्यात गुन्हा देखील दाखल केला होता त्यात देखील काहीच कारवाई झाली नाही आज तोच गुन्हा पुन्हा वरवंडीत झाल्याने सदरील अधिकाऱ्याकडे येथील ग्रामस्थ संशयाने पाहताना दिसते.