मावळते मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडून स्विकारला पदभार
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे.राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे ४९ वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले.
मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते.
प्रशासकीय अधिकारी तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सौनिक यांचा तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल, पुप्षगुच्छ,मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.तसेच नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांचे शाल, पुप्षगुच्छ,देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मा. मुख्य सचिव मनोज सौनिक, राजेश कुमार यांच्या पत्नी श्रीमती अर्चना राजेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य नाही, महाराष्ट्र हा एक विचार असून हा विचार कर्तृत्वाचा आणि नवचैतन्याचा आहे. अशा राज्यात शासन ही सत्ता नसून येथे नेतृत्व करायला मिळणे म्हणजे परिणाम घडविण्याची, लोकसेवा करण्याची संधी आहे. राज्य शासनाने मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते असे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी काढले.